कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली.यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि आठ आमदारांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
हा शपथविधीचा सोहळा बेंगलोर येथील कंठीरवा स्टेडियमवर पार पडला.यावेळी राज्यपाल थावरचंद्र गहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच नूतन आमदार म्हणून निवडून आलेले डॉ जी परमेश्वर के एज मुनियाप्पा के जे जॉर्ज ॲम्बे पाटील सतीश जारकीहोळी,प्रियांक खर्गे आणि जमीर अहमद खान यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
यावेळी या शपथविधी सोहळ्यास देशभरातील काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावून हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ए राजा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ फारूक अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री महबूब मुफ्ती प्रियांक वड्रा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते.