खडे बाजार उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरुण कुमार कोळळूर यांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या चर्चेदरम्यान त्यांनी चित्ररथ मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्यावर बंदी असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले सदर बैठक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी सायंकाळी पार पडली.
यावेळी या बैठकीत त्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे त्याचबरोबर शिवजयंती चित्ररथ मंडळांनी डॉल्बी लावू नये अशी सूचना केली.
शनिवार दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजता नरगुनकर भावे चौक येथून पालखीचे पूजन झाल्यावर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
त्यानंतर ही मिरवणूक मारुती गल्ली हुतात्मा चौक रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक रामदेव गल्ली कॉलेज रोड धर्मवीर संभाजी चौक रामलिंग खिंड गल्ली टिळक चौक हेमुकलाणी चौक पाटील गल्ली शनी मंदिर सर्कल कपिलेश्वर ओवर ब्रिजवरून कपलेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात करण्यात येणार आहे.
दरम्यान या मार्गावर डॉल्बी लावू नये अशी सूचना एसीपी अरुण कुमार कोळळूर यांनी केली आहे यावेळी या बैठकीत मिरवणुकीत कोणतेही अडथळे येऊ नयेत याची दक्षता घेण्याची मागणी मंडळाकडून पोलिसांना करण्यात आली.
शहरांमध्ये होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकी करिता आतापर्यंत 58 मंडळांनी नोंदणी केली आहे प्रत्यक्षात 75 होऊन अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत अशी माहिती विकास कलघटगी यांनी पोलिसांना दिली.याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष रंजीत चव्हाण पाटील विजय जाधव प्रवीण तेजम यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला.