राणी चन्नम्मा विद्यापीठाने स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार अर्ज भरणा केला जात आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तराच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरचा लिखित परीक्षा 28 फेब्रुवारी पासून 8 मार्च पर्यंत होणार आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षांसाठी अर्ज भरणे सुरू करण्यात आली असून 12 फेब्रुवारी पर्यंत दंडा सहित अर्ज भरता येणार आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. परीक्षा अर्ज तीन फेब्रुवारीपासून भरला जात असून विना दंड नऊ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहे .तसेच रोज शंभर रुपये दंडासहित 10 ते 12 फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरता येणार आहेत .अर्ज भरणा करण्यासाठी अवघे दिवस शिल्लक राहिले असल्याने विद्यार्थी धावपळ करत आहेत .विद्यापीठाकडून लेखी परीक्षांचे वेळापत्रक 12 फेब्रुवारीला जाहीर केले जाणार आहे .तसेच 23 फेब्रुवारीला परीक्षा प्रवेश पत्र स्टुडंट पोर्टल वरून डाऊनलोड करता येणार आहे.
पोर्टल वरून डाउनलोड करता येणार परीक्षा प्रवेशपत्र
By Akshata Naik

Must read
Previous articleदोन कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी
Next article*आता परदेशातही होणार लोच्या*