यल्लमा देवीची यात्रा यंदाही रद्द करण्यात आल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. तसेच यल्लामा डोंगराकडे जाणाऱ्या बस आगाराला ही मोठा फटका बसला आहे. यात्रेवर निर्बंध आणल्याने प्रशासनाच्या या निर्णयामुळे निपाणी आगाराला या काळातही दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरवावे लागले आहे.कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीची मागणी यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द असल्यामुळे बस आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे.