दरवर्षी प्रमाणे कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे येत्या रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दहावी परीक्षेतील विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख वक्त्या नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या प्रीती पाटील व तेजस्विनी कांबळे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भारत मोरे, यशवंत जाधव, कुमार बाचीकर, मोहन मोरे, भाऊराव कणबरकर, प्रसाद जाधव यांनी पुरस्कृत केला आहे.
त्याप्रसंगी करुणा भास्कळ (84.96% बिजगर्णी), प्रेरणा मुंजोळे (89.92% बेळवट्टी), सुदेश पाटील (93.73% कर्ले), रोहिणी वि.पाटील (88.16% कर्ले), रुपाली मोटर (88.16% राकसकोप) मंथन मो.पाटील (86.08% बेळगुंदी), गौरी ग.शहापूरकर (94% बेळगुंदी), निखिल ना.कणबरकर (89% बारावी विज्ञान), हर्षद भैरटकर (85% बारावी विज्ञान), प्रणाली मोरे (70% कावळेवाडी) यांच्यासह स्वस्तिक मोरे (पैलवान) आणि निशिगंधा ना.मोरे (एम.काॅम , कावळेवाडी) यांचा खास गौरव करण्यात येणार आहे. तरी या विद्यार्थी गुणगौरव समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाय. पी. नाईक, मनोहर मोरे व सूरज कणबरकर यांनी केले आहे.