भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हालगा गावानजीक आज शुक्रवारी दुपारी घडली. सदर अपघातात दुचाकी मोटरसायकल स्वाराच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. अपघात घडताच अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. दुचाकीस्वाराला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता. तसेच बघ्यांची गर्दी झाली होती.
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी
By Akshata Naik

Previous articleरविवारी कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा