बेळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप नेते आणि काँग्रेस नेते गोवा विधानसभा चा निवडणुकीचा प्रचार करण्यात गुंतले आहेत. तर काहीजण गोव्यामध्ये तळ ठोकून बसले आहेत. तसेच गोव्यातील उमेदवारांचा प्रचार करण्यात गुंतले असून विविध मतदार संघात ते फिरत आहे.
सध्या उत्तरचे आमदार अनिल बेनके हे देखील गोव्यात असून त्यांनी या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण असे मानले जाणारे भाजप नेते संतोष यांची भेट घेतली आहे. बेनके गोवा येथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचारात गुंतले आहेत .गोवा मधल्या सावर्डे या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रभारी असून गणेश गावकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत .
गणेश गावकर हे भाजप उमेदवार निवडणुकीत नक्कीच जिंकतील असा विश्वास उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी संतोष यांच्याकडे व्यक्त केला आहे .त्यामुळे निवडणुकीसाठी उभारलेल्या उमेदवारांना हत्तीचे बळ मिळत आहे.