देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची येथील नागनूर बसवेश्वर ट्रस्टच्या चिनम्मा हिरेमठ वृद्धाश्रमामध्ये पर्यावरण दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे वृद्धाश्रमाच्या आवारात तुळस, पारिजात, बेल आदी झाडांची रोपे लावण्यात आली. याप्रसंगी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी पर्यावरण हा मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे, झाडांची कत्तल होऊ न देणे आणि रोपांची लागवड करून त्यांची जोपासना करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे त्यांनी वृद्धाश्रम आवारात लावण्यात येणाऱ्या रोपांचे औषधी गुणधर्म सांगितले. वृक्षारोपण कार्यक्रमास एस. एम. चौगुले, मडिवाळप्पा नरगुंद, बी. जी. जिनगौडा, आप्पासाहेब देसाई, अल्लाबक्ष आदींसह चिनम्मा हिरेमठ वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी -आजोबा उपस्थित होते.
चिनम्मा हिरेमठ वृद्धाश्रमात पर्यावरण दिन साजरा
By Akshata Naik

Previous articleप्रलंबित बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
Next articleकाडसिद्धेश्वर स्वामींच्या गाडीचा अपघात