काडसिद्धेश्वर स्वामींच्या गाडीचा अपघात काकती जवळ झाला यावेळी अपघातात दोघेजण जागीच ठार तर स्वामी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.
धर्मांतर कायदा मागे घेण्यात यावा यासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावकडे येत असणाऱ्या काड सिद्धेश्वर स्वामींच्या कारचा अपघात झाला. यावेळी अल्टो कारने समोर निघालेल्या कंटेनरला मागे धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनर ने जबरदस्त धडक दिल्यामुळे होनगा येथील बेन्नाळी पुलावर घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात इतका भयानक होता की दोन टँकर मध्ये सापडलेल्या कारचा पूर्णपणे चंदामेंदा झाला दैव बलवत्तर म्हणून श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी या अपघातातून बाल बाल बचावले आहेत.
तर पांडुरंग मारुती जाधव वय 60 राहणार कोल्हापूर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच मृत दुसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही . कार्ड सिद्धेश्वर स्वामीजींना सध्या उपचाराकरिता बेळगाव मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात दाखल करण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळतात काकतीचे पोलीस निरीक्षक विजय शिरूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठविला.