खानापूर, देसुर, मच्छे येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बेळगावला येत असतात पण बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी मिळेल त्या बसने आपला जीव धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने बसला लटकून प्रवास करीत रोज कॉलेज जातात.
दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी खानापूर हुन बेळगाव ला येणारी KA22F2041 बस ही प्रवाशांनी आणि विद्यार्थीनी तुडुंब भरली होती आणि काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते .
विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता स्थानिक गावातील बस वेळेवर येत नाहीत आणि लांब पल्याच्या बसेस देसुर, मच्छे आणि पिरणवाडी येथे विद्यार्थ्यांना वाहक मनाई करतात अशी माहिती मिळाली.याबद्दल हुबळी येथील वायव्य परिवहन महामंडळाला सदर बाब ट्विटर द्वारे निदर्शनास आणून दिली आहे .
तसेच शाळा आणि कॉलेजच्या वेळेत ज्यादा बसेस सोडण्यात अशी मागणी ट्विटरद्वारे केली असून युवा समिती ने आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
त्यानंतर वायव्य परिवहन मंडळाने सदर तक्रार बेळगावच्या विभागीय कार्यालय कडे वर्ग केली असून तक्रार निवारण केली जाईल असे त्यांनी ट्विटर द्वारे युवा समिती ला कळविले आहे.