आपल्या प्रियकरा सोबत हात मिळवणी करून पतीला मारण्याचा कट रचणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. रमेश कांबळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी संध्या रमेश कांबळे हिने आपल्या प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत आपल्या पतीचा काटा काढला आहे.
अनैतिक संबंधातून तिने आपल्या पतीचा खून केला असून पतीचा खून करून तो बेपत्ता झाल्याची तक्रार तिने स्वतः पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याप्रकरणी पोलिसांनी छडा लावत तक्रार करणारी पत्नी महिलेला तसेच तिच्यासोबत चौका जणांना ताब्यात घेतली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी आपला पती बेपत्ता झाला असल्याची तक्रार तिने एपीएमसी पोलीस ठाण्यात केली होती. तसेच पोलिसांनी तपास केला असता संशयास्पद सध्याची वागणूक पाहून तिची चौकशी केली या दरम्यान संध्याकाळी ने आपला गुन्हा कबूल केला.
मृत पती रमेश याला तिचे परपुरुषाची असलेले संबंध समजले त्यामुळे त्याचा काटा काढण्याकरिता तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली आणि रमेशला झोपेच्या गोळ्या दिला त्यानंतर त्याचा गळा अळून खून केला तसेच त्याचा मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात फेकून दिला.
पोलिसांनी सध्या संध्यासह अन्य चौघा जणांना अटक केली आहे तसेच हा गुन्हा तिने एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदविला असून पोलीस अद्याप रमेश चा मृतदेह चोर्ला घाटात शोधत आहेत