खवव्याचे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खेकड्याने आता बेळगावात धमाकेदार एन्ट्री मारली आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने काही नाले नदी पुढे यामधून खेकडे बाहेर येत आहेत.
त्यामुळे खेकडे विक्रेते या खेकड्यांना पकडून ते बाजारामध्ये विकत आहेत. कॅम्प येथे आज खेकडे विक्री करण्याकरिता काही महिला आल्या होत्या.
हिडकल जलाशय तसेच अन्य ठिकाणाहून त्यांनी खेकडे बेळगावात विक्रीकरिता आणले होते. या खेकड्यांची किंमत 150 रुपये जोडी शंभर रुपयाला छोटे खेकडे चार अशा प्रमाणे ते विकत होते.
यावेळी बऱ्याच खव्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरविण्याकरिता खेकड्यांची खरेदी केली. खेकडे हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याने तसेच त्याचे अनेक फायदे शरीराला असल्याने नागरिकांनी खेकडे खरेदी करण्याकरिता गर्दी केली होती.