तिसरे रेल्वे गेट हा अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे
या ठिकाणी दररोज दुचाकी स्वार घसरून पडत असून येथील रस्त्याच्या डागडूजीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
आज या मार्गावरून एक व्यक्ती जात असताना दुचाकी वरून घसरून पडला. त्याच्यासोबत एक शाळकरी मुलगी देखील होती सुदैवाने हे दोघांना काही झाले नसले तरी चिखलात पडल्याने त्यांचे संपूर्ण कपडे खराब झाले .
हॉटेल नेटिव्ह च्या शेजारी ही परिस्थिती येथील रस्ता लवकरात लवकर करावा जेणेकरून खड्ड्यात वाहने अडकून पडणार नाही अशी मागणी नागरिक करत आहेत.