भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस तसेच डाॅक्टर्स डे असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. अशोक खोबरे उपस्थित होते.
प्रारंभी विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार रामचंद्र तिगडी यांनी स्वागत केले. डॉ. जे. जी. नाईक यांनी भारत विकास परिषदेच्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. पांडुरंग नायक यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी डाॅक्टरांचे कार्य व वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचे विवेचन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ डाॅ. अशोक खोबरे यांचा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवाकार्य केल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराबाबत डाॅ. खोबरे यांनी कृतज्ञता व्यक्त करून भारत विकास परिषदेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील निःस्वार्थ राष्ट्रकार्याचा गौरव केला. परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास सांगलीकर यांची सुकन्या ऐश्वर्या सांगलीकर हिने सी. ए. परीक्षेत उत्तुंग सुयश मिळविल्याबद्दल तिचा खास गौरव करण्यात आला.
प्रा. अरूणा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी एम्. जी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डाॅ. व्ही. एन्. जोशी, एन्. बी. देशपांडे, सुहास सांगलीकर, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, जयंत जोशी, अमर देसाई, नामदेव कोलेकर, कुबेर गणेशवाडी, पी. जे. घाडी, रजनी गुर्जर, स्नेहा सांगलीकर, जया नायक, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, तृप्ती देसाई, उमा यलबुर्गी आदि उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.