खानापूर तालुका म. ए. समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक माजी आमदार दिगंबरराव पाटील व माजी सभापती मारुती परमेकर यांच्या उपस्थितीत राजा शिवछत्रपती स्मारक येथे सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत म. ए. समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड १० जुलै २०२३ रोजी करण्यात आली होती. यात खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवीसह, चिटणीस रणजीत खजिनदार संजीव पाटील, पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जांबोटी विभाग जयराम देसाई, गर्लगुंजी विभाग कृष्णा कुंभार, लोंढा विभाग कृष्णा मन्नोळकर, नंदगड विभाग रमेश धबाले आणि खानापूर शहर विभाग मारुती देवाप्पा गुरव यांची निवड करण्यात आली होती. या नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी पुढील कार्याची संपूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली.