खादरवाडी गावातील गाव हित मंचातर्फे गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
खादरवाडी गांव हित मंचातर्फे गेल्या सोमवारी सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गरीब गरजू मुलांना वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेतील निराधार मुलांची शालेय फी गाव हित मंचतर्फे शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. खवणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. खादरवाडी गाव हित मंचाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश प. पाटिल यांच्याकडून शालेय दफ्तारांचे वाटप करण्यात आले. खादरवाडी गाव हित मंचतर्फे यंदा पेहल्यांदाच हा उपक्रम हाती घेऊन यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक खवणेकर व प्राथमिक शाळेचे मुख्याधापक कडांगलेसर यांनी गाव हित मंचच्या या उपक्रमाची प्रशंसा करून या माध्यमातून गरीब व निराधार मुलांना मदत केल्याबद्दल मंचच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
गाव हित मंचतर्फे देवाप्पा कोलेकार यांनी मंचचे उद्दिष्ट व कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. तसेच गाव हितासाठी यापुढेही असे उपक्रम राबवू असे नमूद केले. याप्रसंगी रमेश पाटील यांच्यासह ब्रह्मलिंग शिक्षण मंडळाचे सचिव नामदेव बस्तवाडकर, गाव हित मंचचे कार्यकर्ते परशराम सप्ले, देवाप्पा कोलेकर, राजु पाटील, यल्लाप्पा माळवी, राजू वाडेकर, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.