सुनेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपातून सासूची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जयश्री राजाराम डुकरे (वय ५०, रा. लक्ष्मी गल्ली, किणये) असे त्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी अनुराधा अमोल डुकरे (वय ३२) हिचा अमोल याच्याशी विवाह झाला होता. त्यांना मुलगीही आहे. पाच ते सहा वर्षांनी अमोल हा पत्नी अनुराधा हिच्याशी वारंवार भांडत होता. सासू जयश्री, दीर बजरंग अनुराधाला त्रास देत असल्याने ती माहेरी राहत होती. अनुराधा मुलीची कागदपत्रे आणण्यासाठी घरी गेली असता तिला मारहाण झाल्याने तिने महिला पोलिसात फिर्याद दिली होती. या प्रकरणी भादंवि ४९८- अ, ३२३, ३२४, ५०४ सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या काळात पती अमोल व दिराचे निधन झाले. न्यायालयामध्ये साक्षीदारातील विसंगतीमुळे सासू जयश्रीची निर्दोष मुक्तता केली.
सुनेला त्रास दिल्याच्या आरोपातून सासू निर्दोष
By Akshata Naik
Previous articleखादरवाडी गाव हित मंचतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleबेघर व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत