No menu items!
Friday, August 29, 2025

ध.संभाजी नगर श्री गणेशोत्सव मंडळअध्यक्षपदी विनायक मोरे यांची निवड

Must read

 धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्री गणेश मंदिर सभागृहात खेळीमेळीत झाली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, उपाध्यक्ष म्हणून सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद यळ्ळूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावर्षीचा श्री गणेशोत्सव भव्य व अपूर्व उत्साहाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
दरवर्षी श्री गणेशोत्सवात अनेक नाविण्यपूर्ण विधायक उपक्रमांचे मंडळाच्यावतीने आयोजन करण्यात येते. लोकमान्य आयोजित विधायक श्रीगणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला होता. रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन, जनजागृतीपर प्रभातफेरी, अनाथाश्रमास दरवर्षी मदत, भजन व किर्तन, संगीत कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी बौध्दीक व क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर, श्लोक पठण, गणहोम आदिंचे आयोजन मंडळाच्यावतीने आजवर करण्यात आले आहे. सुश्राव्य आरत्यांच्या मंगलमय गजरात नियोजित वेळेत श्री गणेशाचे आगमन व विसर्जन तसेच मिरवणूकीत धांगडधिंगा नृत्यास संपूर्णपणे मनाई ही या मंडळाची खास वैशिष्ट्ये आहेत.

नविन कार्यकारिणी-
अध्यक्ष- विनायक मोरे, उपाध्यक्ष- सचिन बांदिवडेकर, सेक्रेटरी- चेतन केसरकर, ॐकार कदम, उपसेक्रेटरी- कौशिक जाधव, विनय पाटील, खजिनदार- सूरज पाटील, अभिजित केसरकर, उपखजिनदार- संकेत सांबरेकर, हिशेब तपासनीस- विनायक अकनोजी, प्रणव मोरे, कार्याध्यक्ष- प्रसाद यळ्ळूरकर, प्रसाद पाटील, उपकार्याध्यक्ष- प्रकाश पाटील, प्रवीण मोरे, जगदीश शट्टिबाचे, स्वयम् सैनुचे.
विश्वस्त – मारूती जायण्णाचे, भाऊराव पाटील, परशराम नावगेकर, गोकुळ अकनोजी, नारायण केसरकर, प्रदीप शट्टीबाचे, श्रीधर जाधव, महादेव मोरे, अमित सैनुचे, धोंडिबा मोहिते, परशराम बगाडे, करवीर भंडारी तसेच समस्त महिला मंडळ.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!