माळी गल्ली येथील छत्रपती श्री शिवाजी युवक मंडळ आणि प्रसाद होमिओ फार्मसी यांच्या वतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिबिराचे लस देवून उद्घाटन करण्यात आले
गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत माळी गल्लीतील मंडळाने सतत डेंग्यूस चिकन गुनिया लसीकरण केले आज या परिसरातील 600 हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, भाऊराव चौगुले प्रभाकर बामणकर,कपिल खटावकर, चेतन गंगधर परशराम वांद्रे अनुराधा चौगुले, मनिशा काकडे, राधिका ठोकणेकर विमल लंगरकी डे, राधिका ढाकणकर सरिता मिरजकर, सुंदरा इतापे यांच्या सह महिला व मुले सदस्य उपस्थित होते.