No menu items!
Friday, August 29, 2025

बेळगाव येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर व्याख्यान !

Must read

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

बेळगाव – अनेकजण पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या जयशंकर भवन, शहापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या व्याख्यानाच्या प्रसंगी बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ बेळगाव शहरातील अनेक जिज्ञासूंनी घेतला.
सद्गुरु स्वाती खाडयेे यांनी दु:खाची कारणे, साधनेचे विविध मार्ग, कलियुगात योग्य साधना कोणती आहे आणि कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले आणि साधना समजून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या साप्ताहिक साधना सत्संग वर्गसाठी येण्याचे आव्हान केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी हिंदूंची सद्यस्थिती, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी संकटे या संदर्भात माहिती देऊन त्यावर उपाययोजना सांगितल्या. उपस्थित जिज्ञासूंनी शेवटपर्यत उत्सुकतेने विषय समजून घेतला आणि शंकानिरसन करून घेत साधना सत्संग वर्गासाठी येण्याचा निर्धार केला.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!