No menu items!
Monday, December 23, 2024

गो-गंगा गोशाळा ट्रस्ट, बेळगावी, कर्नाटक

Must read

गौ-गंगा गोशाळा ट्रस्ट आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ बेळगाव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन कर्नाटक आणि गोमाता फाऊंडेशन तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शेतकरी आणि शहरी रहिवाशांसाठी दोन दिवसीय गायीवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 19 व 20 ऑगस्ट रोजी हे कार्यक्रम होणार आहेत.

सध्याच्या घडीला कुटुंबांमध्ये पती, पत्नी, मुले किंवा संपूर्ण कुटुंबातील कोणीतरी विविध आरोग्य आणि तणावाच्या समस्यांनी ग्रस्त असतात. तंत्रज्ञानात प्रगती होत असली तरी नवीन आव्हाने समोर आहेत. त्यासाठी या दोन दिवसीय कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

19 आणि 20 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात गो-आधारित उत्पादने बनवण्याच्या प्रात्यक्षिक सत्राने होईल. तुकाराम पवार, डॉ. जीवन आणि नंतर इस्कॉन मंदिराचे परमपूज्य भक्तीरासमृतजी महाराज उपस्थित राहणार आहेत. सायंकाळच्या कार्यक्रमात महाराजांचे आशीर्वचन होईल. याचबरोबर श्री निरंजन वर्मा गुरुजी अनेक गोपालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन दिवसात गुजरात भवनमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, पाठीच्या समस्या आणि कर्करोगाशी संबंधित समस्यांवर तपासणी आणि उपचार केले जाणार आहे. बेळगावातील नागरिकांनी या उपचारासाठी नोंदणी करावी (विकास पवार 99026 76980 यांच्याशी संपर्क साधवा) असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी बेळगाव येथील इस्कॉनचे परमपूज्य श्री भक्तीरसामृत महाराज, निडसोशीचे परमपूज्य निजलिंगेश्वर स्वामी (उत्तराधिकारी), वासन येथील प्रख्यात डॉ. हमनमंत मळली, कर्करोग तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. यावेळी विचारवंत राजीव दीक्षित यांचे व्याख्यान होईल. तामिळनाडूचे प्रसिद्ध वनस्पती आचार्य हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या ज्ञानसत्राचा बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकरी व शहरवासीयांनी लाभ घ्यावा

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!