इतरांनी दिलेल्या गोष्टी जमा करून न ठेवता त्या इतरांच्या उपयोगी पडाव्यात हेतूने सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी यांनी एक आगळावेगळा उपक्रम आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राबविला.
प्रसूती गृहामध्ये नवजात बालकांना त्यांनी आपल्याला दिलेल्या शाल नवजात शिशूंना देऊ केल्या. सर्व मातांना सफरचंदांचे वाटप देखील केले.
समाजामध्ये करत असलेल्या कार्याची दखल घेऊन अनेकांनी वीरेश हिरेमठ यांचा सत्कार केला. यावेळी सत्कारामध्ये त्यांना देण्यात आलेली शालिंचा ढीग त्यांनी आपल्याकडे न घालता ते नवजात बालकांना उपयोगी पडाव्यात आणि या सत्कारामधून मिळालेले आशीर्वाद शालीच्या रूपात बालकांना मिळावे करिता त्यांनी आज सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रसूती गृहातील बालकांना शाल देऊ केली.
यावेळी आपल्या बालकांची काळजी कोणीतरी घेत आहे या विचाराने सर्व माता देखील भावूक झाल्या होत्या. याप्रसंगी नर्स डॉक्टर आणि गिरीश मध्ये यांनी सर्व मातांना शाल आणि सफरचंदांचे वाटप केले.