शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी गावचे सुपुत्र व जवान गणपती बामुचे यांच्या पत्नी लक्ष्मी गणपती बामुचे यांनी शाळेला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेटवस्तू शाळेचे मुख्याध्यापक नारायण तुकाराम भाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रताप सुर्यवंशी , सचिव बी.डी. तुडयेकर , ग्रामपंचायात सरपंच गणपत बामुचे , उपसरपंच पुंडलिक पाटील , माजी सरपंच नितिन पाटील , डॉ ऐश्वर्या पाटील व डॉ. भूषण पाटील ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे , मुख्याध्यापक एन.टी भाटे व रवी पाटील ग्राम पंचायत सदस्यांचा शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव शिंदे , उपाध्यक्ष प्रकाश गावडे ,शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते .