रक्षाबंधना निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्य वापरत अनेक विविध रंगी राख्या तयार केल्या होत्या.यामध्ये इयत्ता पहिलीपासून ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या तयार केलेल्या राख्या विक्री करण्याची व खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आली.तयार केलेल्या राख्या शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले.