अनगोळ येथील विश्वकर्मा मनुमय संस्था लोहार गल्ली अनगोळ यांच्यावतीने विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण दहा वाजता तीर्थप्रसाद दुपारी एक ते तीन महाप्रसाद दुपारी चार ते पाच गुरुदत्त सेवा भजनी मंडळ भजनाचा कार्यक्रम पाच ते सहा महिलांसाठी तिळगुळ समारंभ सायंकाळी सहा ते सात विश्वकर्मा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम यानंतर लोहार परिवार भजनी माऊली मंडळ यांच्यावतीने भजन व रात्री शालेय विद्यार्थ्यांसाठी संगीत व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विश्वकर्मा देवस्थान कमिटी अनगोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.