श्री राम सेना हिंदुस्थान शहापूर बेळगांव यांच्यावतीने रविवार दि 13/2/2022 रोजी सकाळी 9 वाजता श्री राम मंदिर मिरापूर गल्ली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बेळगाव शहरातील विविध रुग्णालयातून रक्तदान करावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे असंख्य फोन येत आहेत त्यामुळे याची दखल घेऊन श्री राम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि रुग्णांला जीवदान द्यावे असे आवाहन रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे
श्री राम सेना हिंदुस्थानच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
By Akshata Naik
Previous articleविश्वकर्मा जयंती निमित्त अनगोळ मध्ये विविध कार्यक्रम