दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी कराटे इंडिया आॅर्गनायझेशन यांच्यावतीने बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय आॅफिशियल कराटे निवड चाचणीमध्ये 17 वर्षातील वयोगटात भाग घेऊन कृष्णा देवगाडी याने सुवर्णपदक पटकाविले व त्याला सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्र देउन सन्मान करण्यात आले.
त्याकरिता कृष्णा याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
21 सप्टेंबर 2023 रोजी देहराडुन उत्तराखंड येथे होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कृष्णा देवगाडी प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा आणि कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे.