आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचालित मुक्तांगण इंग्रजी माध्यम शाळेचे क्रीडा शिक्षक अर्जुन गणपती भेकणे यांचा शाळेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मागील 13 वर्षापासून मुक्तांगण शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अर्जुन भेकने यांनी अनेक जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू निर्माण केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात आला
शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जे के यांनी स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रज्ञा हेगडे,अनिता डिसोजा,शीतल हेब्बाळकर,पुष्पा जांबोटकर,मेघा बसुरतेकर,दयानंद तावरे,व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.