कर्नाटक संघाने छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, पुणे येथे 9 सप्टेंबर 2023 ते 11 सप्टेंबर 2023 या कालावधीत झालेल्या 5 व्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप 2023 मध्ये रौप्य पदक मिळवले.
त्यामुळे उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कर्नाटक संघाचे कर्णधार महांतेश होनगल आणि कर्नाटक संघाचे प्रशिक्षक शबसप्पा सुनाडोली यांचे अभिनंदन केले आहे .
तसेच त्यांच्या पुढील कामगिरीसाठी आपल्याला मदत आणि सहकार्य करण्यास सदैव तयार आहोत. मला तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये बघायचे आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत .
या झालेल्या स्पर्धेत एकूण 15 संघ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र संघाने प्रथम, कर्नाटक संघाने द्वितीय तर बिहार संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे