No menu items!
Saturday, August 30, 2025

विशेष संवाद : सेक्युलर विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?

Must read

शाळांमधून चालू असलेला इस्लामी प्रचार रोखा ! – श्री. जयेश थळी

गोव्यात मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ‘इस्लामिक कार्यशाळे’चे आयोजन केले जात असल्याचे ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थे’ने स्वत: सांगितले आहे. या संघटनेचा टर्की देशातील ‘टुगवा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध आहे. विद्यार्थ्यांमध्ये कट्टर इस्लामचा प्रचार करून ‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाप्रमाणे ‘द गोवा स्टोरी’ तयार केली जात आहे. गोव्यात पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंत्राला अजूनही विद्यार्थी बळी पडण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचा तपास करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे. गोव्यातील तथाकथित निधर्मीवादी केशव स्मृती विद्यालयाच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत आणि एखाद्या घटनेत अल्पसंख्यांक पीडित असते, तर त्यांनी देशभर आरडाओरड केली असती. ‘सेक्युलर’ विद्यालयांमधून हिंदूंना स्वत:च्या धर्माचे शिक्षण मिळत नाही; मात्र शाळांमधून ‘स्कूल जिहाद’ चालवला जात आहे, तो रोखला पाहिजे, *असे प्रतिपादन ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्री. जयेश थळी यांनी केले.* हिंदु जनजागृती समितीने आयेजित केलेल्या *‘सेक्युलर विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?’* या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या वेळी *विश्व हिंदु परिषदेचे दक्षिण गोवा सहमंत्री श्री. संजू कोरगावकर म्हणाले की,*  गोव्यातील दाबोळी, वास्को येथील केशव स्मृती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षण खाते, विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ, विद्यार्थ्यांचे पालक यांना अंधारात ठेवून विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांना जवळच्या मशिदीत इस्लामिक कार्याशाळेसाठी पाठवले. ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ यांच्या सूचनेवरून विद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कृती केली. मशिदीत उपस्थित मौलवीने ‘अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे आणि हिंदूंचे देव नसून ते दगड आहेत’ असे सांगून विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद केला. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने स्वत:ला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर केला. विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास भाग पाडले. विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. गोव्यात वर्ष 2018 ते 2023 या कालावधीत 1 हजार 753 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी आहे. सरकार आणि प्रशासन यांनी केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमला पाहिजे. निलंबित प्राचार्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, *अशी मागणीही कोरगावकर यांनी केली.* 

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!