कलिंगडमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिमा साकारण्यासाठी त्यांना दोन तासाचा कालावधी लागला.भातकांडे हे शेफ म्हणून उत्कृष्ट डिशेस बनवण्या बद्दल प्रसिध्द आहेत.या बरोबरच ते मास्टर
कार्व्हिंग शेफ म्हणून देखील ओळखले जातात.
यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींची प्रतिमा
कार्व्हिंग मधून साकारली आहे.परदेशात देखील त्यांनी आपल्या उत्कृष्ट डिशेस द्वारे आणि अनेक कार्यक्रमातील कार्व्हिंग प्रदर्शनामुळे नावलौकिक मिळवला आहे. दुबई आणि कुवेत मध्ये भातकांडे यांनी सेवा बजावली आहे.वीस वर्षांहून अधिक काळ शेफ म्हणून भातकांडे यांनी सेवा बजावली आहे.देशातील आणि परदेशातील अनेक पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांनी सेवा बजावली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावातील प्रसिध्द शेफ आर.के. भातकांडे यांनी कलिंगड फळामध्ये कार्व्हिंग करून गणपती साकारला आहे.
