No menu items!
Tuesday, September 2, 2025

केएलई हॉस्पिटल आवारात महिलेला कारची धडक

Must read

केएलई हॉस्पिटलचे आवारात एका भरधाव कारने धडक दिल्यामुळे एक पादचारी महिला 4 -5 फूट उंच उडवून रस्त्यावर आपटल्याची घटना आज सकाळी 8:10 वाजण्याच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात त्या महिलेला कोणतीही गंभीर इजा झाली नाही.

केएलई हॉस्पिटलचे आवार हे अलीकडे तेथील कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि शिकाऊ डॉक्टरांसाठी जणू शर्यतीचे मैदान झाले आहे. हॉस्पिटल आवारा असल्यामुळे खरे तर या ठिकाणी वाहनांची ये-जा शिस्तीत संथ गतीने झाली पाहिजे. तथापि केएलई हॉस्पिटलमधील कांही कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स हॉस्पिटल आवारात सुसाट वेगात बेदरकारपणे आपली वाहने हाकत असतात. याचाच दुष्परिणाम म्हणजे आज सकाळी 8:10 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटल आवारामध्ये केएलई नर्सिंग कॉलेज समोर रस्त्याकडेने चालत जात असलेल्या एका पादचारी महिलेला भरधाव कारने (क्र. केए 22 झेड 5753) धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ती बिचारी बेसावध महिला 4 -5 फूट उंच उडवून रस्त्यावर आपटली. हा प्रकार पाहून आसपासच्या नागरिकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला सावरले. दैव बलवत्तर म्हणून कारच्या धडकेमुळे त्या महिलेला फारशी दुखापत झाली नाही. आजचा हा प्रकार लक्षात घेता केएलई हॉस्पिटल आवारात निष्काळजीपणे बेदरकार वाहने चालवण्यावर तात्काळ निर्बंध घालावयास हवा अन्यथा एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी केएलई हॉस्पिटलच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे देऊन हॉस्पिटल आवारात गतिरोधक बसवण्याबरोबरच वाहने चालवण्याचा ठराविक वेग निश्चित करावा आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!