बसवाण्णा मंदिर नेहरू नगर येथे बसवाण्णाची आरती करून प्रमुख पाहुणे एपीएमसी पीएसआय मंजुनाथ बजंत्री यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली.प्रारंभी सदाशिवनगर येथून दौड निघून नेहरूनगर, कोल्हापूर सर्कल त्यानंतर गॅंगवाडी, वडारवाडी येथून पुढे अशोक नगर मार्गे जोतिबा मंदिर येथे दौडीचा समारोप झाला. जोतिबा देवस्थान कमिटीच्या वतीने श्री दुर्गा माता दौडीचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर आरती म्हणून ध्येय मंत्र झाल्यानंतर मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. आजच्या दौडीत अनेक ठिकाणी स्वागत कमानी लावून दौडीचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर जोतिबा देवस्थान कमिटीच्या वतीने सर्वांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
उद्याची श्री दुर्गामाता दौड धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक येथून प्रारंभ होऊन संयुक्त महाराष्ट्र चौक येथे सांगता होणार आहे.