गोपाळ जिनगौडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित देवेंद्र जिनगौडा संस्थेचा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कुमार सुहर्ष बसवराज कंबार याची नुकताच जिल्हा क्रीडांगण वर झालेल्या जिल्हा पातळीवरील लांब उडी या स्पर्धेत अतिशय उत्तम प्रदर्शन करून प्रथम क्रमांक संपादन केला आहे. याकरिता त्याची उडपी येथे होणाऱ्या राज्यपातळी स्पर्धे करिता निवड झाली आहे. हा श्री बसवराज कंबार. शिक्षक सरकारी कन्नड माध्यम शाळा शिंदोळी. तसेच सौ आर. बी. लोहार शिक्षिका सरकारी मराठी शाळा सांबरा यांचा मुलगा असून त्याला क्रीडा शिक्षक प्रशांत वाडकर व उदय संक्कमणवर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री गोपाळ जिनगौडा सेक्रेटरी कुंतुसागर हरदी , मुख्याध्यापिका, उप मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग या सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.