खानापूर : लक्ष्मी यात्रेपूर्वी गोदगिरी गावातील प्राथमिक सोयी सुविधा, तसेच रस्ता, पाणी, गटर, या सर्व सुविधा शासन दरबारी प्रयत्न करून, सर्व विकासात्मक कामांची अमलबजावणी करून, गोदगेरी गावचा विकास करणार असल्याचे, प्रतिपादन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले. गोदगेरी येथे तुकाराम बीज निमित्ताने सप्ताह साजरा करण्यात येत असून, पुढील वर्षी लक्ष्मी यात्रा होणार आहे. त्या अनुषंगाने गुरूवार दिनांक 28 मार्च रोजी, खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदगेरी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील प्रतिपादन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले.
पुढील वर्षी गोदगेरी येथे लक्ष्मी यात्रा होणार आहे. त्यानिमित्त पूर्व तयारीचे नियोजन करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी यात्रेत भाविक व भक्तांची सोय कशी होईल. यात्रेसाठी कशा पद्धतीने शासकीय अनुदान आणण्यात येईल. व त्यासाठी कशा पद्धतीने पूर्व तयारी करावीत. यासाठी ग्रामस्थांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीला गोधोळी येथील ज्येष्ठ नागरिक श्री मनोहर कदम, श्री शंकर बाळाराम पाटील संचालक पीकेपीएस, भरमानी पाटील विकास आघाडी खानापूर, विष्णु जांबोटकर, मनोहर मंच्यारकर, दिगंबर बेळगावकर माजी तालुका पंचायत सदस्य, प्रसाद गाडगीळ, रामचंद्र निलजकर, भालचंद्र बेळगावकर, महादेव कुणगिनकर, तसेच पंचमंडळी व गोदगेरी ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते.