प्रतिनिधी
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या युथ रेड क्रॉस विंगच्यावतीने मंगळवार दि. 02-04-2024 रोजी महाविद्यालयात तांदूळ, डाळी आणि कडधान्ये यांचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध प्रगतशील शेतकरी शंकर लंगाटी यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतकरी आपले उत्पादन घेऊन प्रदर्शनात विक्रिसाठी येतील हातसडीचे किंवा फार पॉलिश न केलेले तांदूळ प्रदर्शनात असतील. मधुमेहींना उपयुक्त अशा नमुन्याचे तांदूळ असतील
हा उपक्रम सातत्याने राबविण्याचा राणी पार्वती देवी महाविद्यालयाचा मानस आहे. येथे विविध प्रकाराच्या तांदळाच्या जातींची माहिती सांगितली जाते. कडधान, डाळी व इतर सर्व विक्रीस उपलब्ध धान्ये कोणत्याही रासायनिक खताशिवाय पिकविलेली असल्याने ती अधिक पौष्टक व उपयुक्त असतील. तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा. प्रदर्शन व विक्री सर्वांसांठी खुली आहे. सकाळी 10.30 ते 2.00 या वेळेत सर्वांनी याचा लाभ घेता येईल,