येथील महाविद्यालयासमोर विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ धार्मिक घोषणाबाजी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी आज सदाशिवनगर मध्ये ताब्यात घेतले.
विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्सेसच्या मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाबशिवाय वर्गात प्रवेश नाकारण्यात आला .त्यामुळे त्या विद्यार्थिनींनी कोणत्याही परिस्थीतीत हिजाब काढणार नसल्याचे सांगितले .
त्यामुळे त्यांना वर्गखोल्यांच्या आत जाऊ दिले नाही म्हणून त्या विद्यार्थिनी कॅम्पसमधील वर्गखोल्यांच्या बाहेर उभ्या राहिल्या .या घटनेची माहिती मिळताच पालक आणि नातेवाईकांनी संस्थेत धाव घेत व्यवस्थापनाशी वाद घातला आणि धार्मिक घोषणा देऊ लागले . त्यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.