बेळगावच्या गणेशपूर येथे पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रविण पादके असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते गणेशपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी एका घरासमोर आपली बाईक पार्क केल्यानंतर, संबंधित घरमालकासह दोन जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला आहे.
या हल्ल्यात प्रवीण यांच्या चेहऱ्यावर आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ बेळगाव येथील बीआयएमएस (BIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पार्किंगच्या वादांमुळे वाढणाऱ्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे
घरासमोर गाडी पार्क केली म्हणून मारहाण
