No menu items!
Saturday, May 17, 2025

13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरूषाला 20 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड. तर, मुलीला 4 लाख रुपये सरकार देणार

Must read

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात वसलेल्या पास्टोली या ठिकाणी 13 वर्षाच्या मुलीवर 38 वर्षीय व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्याबाबत खानापूर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सदर व्यक्तीला माननीय न्यायाधीशांनी वीस वर्षाची शिक्षा व 10 हजाराचा दंड ठोठावला आहे. तर अन्यायग्रस्त बालिकेला चार लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून सरकार देणार आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त मुलीला दीड वर्षाच्या आतच न्याय मिळाला आहे. आरोपीवर दिड वर्षं न्यायालयात खटला चालवीण्यात आला. आणि न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत वरील शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुन्हा घडला त्या वेळेला सदर पीडित मुलगी 13 वर्षांची होती. पास्टोली (तालुका खानापूर) येथे तिच्या आजीसोबत राहत होती. तिला नीट बोलता येत नव्हते. आरोपी शाहू रामा गावडे (वय 40 वर्ष) पास्टोली तालुका खानापूर यांने 16 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2 वाजता, पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी कोणीही उपस्थित नसताना, पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी आला आणि मुलगी अल्पवयीन आहे. हे माहित असूनही, मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने त्याने तिचे तोंड झाकले आणि तिला तिच्या घरातून उचलून मुलीच्या घरामागील जंगलात नेले आणि त्या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

यानंतर खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि खानापूर पोलिसांनी फरारी असलेल्या आरोपीचा शोध घेऊन कोल्हापूर येथे अटक केली होती. व त्याला न्यायालयात हजर केले. यानंतर खानापूर पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतर, 1 डिसेंबर 2023 रोजी आरोपपत्र तयार करून पोस्को न्यायालयात सादर करण्यात आले. यानंतर खटल्याची सुनावणी माननीय पोस्को न्यायालयात दीड वर्ष झाली. आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. त्यानंतर आज 4 एप्रिल 2025 रोजी, माननीय न्यायाधीश श्रीमती. सी.एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाबाबत मुलीच्या आईने खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार पोलीस कॉन्स्टेबल सीएचसी 2269 ईश्वर जिन्नाप्पागोल यांनी दाखल करून घेतली होती. या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक श्री. मंजुनाथ नायक व गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय चन्नबसप्पा बबली यांनी योग्य तो तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यावेळी खानापूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सीपीसी-3703 मंजुनाथ मुसळी यांनी तपास सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. तर कोर्ट ड्युटी, वॉरंट व समन्स बजावण्याचे काम सीपीसी-3573 पी बी होंदेड यांनी काम पाहिले. तर सरकारी वकील म्हणून व्ही एल पाटील यांनी काम पाहिले.

काल गुरुवारी 3 एप्रिल रोजी पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सी एम पुष्पलता यांनी नंदगड येथील एका वृद्धाला वीस वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज पोस्को अंतर्गत शाहू रामा गावडे (वय 40 वर्ष) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!