चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही म्हणून कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले चिठ्ठीत
बेळगावातील शहापूर मध्ये एका खाजगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने आत्महत्या केली आहे .मृत्यूपूर्वी त्याने आपल्याला मागील चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही त्यामुळे कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ओंकार पवार वय वर्ष 25 असे मयत युवकाचे नाव आहे .रुग्णवाहिका चालक म्हणून तो काम करत होता.