हलगा येथे सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्पाला अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.
हलगा येथील पिकाऊ जमिनीत शेतकरी विविध प्रकारची तिबार पिके घेतात . मात्र सदर जमीन सांडपाणी प्रकल्पाला वापरण्यात येणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतावर सरकार अशाप्रकारे घाव घालून जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत आहे. 2009 साली येथील शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात आल्या होत्या. मात्र कायद्याने तीन वर्षाच्या आत यावर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणे गरजेचे होते.
याबाबत न्यायालयात खटला चालू असून सरकार या गोष्टीकडे कानाडोळा करून जमिनी हडपण्याचा काय करत आहे. त्यामुळे जमीन बळकावणार्यांवर शासनाविरुद्ध जमीन वाचविण्यासाठी धडपडकरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आज पुन्हा संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळात आहे .