रविवार दिनांक 03/04 2022 रोजी श्री शिव तीर्थ श्री क्षेत्र राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेची मासिक मीटिंग अगदी मोठ्या स्फूर्तीने संपन्न झाली .या मासिक मीटिंगची सुरवात श्री शिवशंकर मंदिराची पूजा अर्चा करून आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजे,भगवा ध्वज,यांचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी संपूर्ण कार्यकारी सदस्य व पदाधिकारी या सर्वांचे स्वागत संघटनेचे संयोजक मोनाप्पा भास्कळ साहेब यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल जाधव साहेब यांनी केले त्यानंतर आपल्या समाजातील शेतकरी कामगार वर्ग शैक्षणिक व्यवसायिक वैद्यकीय सांप्रदायिक महिलावर्ग या संपूर्ण क्षेत्रांना अनुसरून संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आपआपली भूमिका जबाबदारी स्वीकारत संघटन का उभे करावे संघटनात्मक कार्य का करावे या बद्दल मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर ह.भ.प.तालुका अध्यक्ष परशराम महाराज,मा.सैनिक परशराम खांडेकर,मोहन तळवार,राजकिरण नाईक,खाचु सुखये,नाथाजी मरगाळे,राहुल शहापूरकर,यल्लाप्पा झंगरुचे यांनी सामाजिक व्यथा तळमळ व्यक्त केली त्यानंतर आपल्या संघटनेचे अध्यक्ष नारायण झंगरुचे साहेब यांनी आपल्या संघटनेचे उद्दिष्ट काय धोरण काय कार्य काय आणि ध्येय काय हे सांगितले त्याप्रसंगी परशराम कनबरकर विजय कुन्नूरकर जयवंत पाटील सोमनाथ मजुकर मारुती सुतार कल्लाप्पा सुतार मुरारी पाटील सुभाष पाटील खेमाणी पाटील असे शेकडो कार्यकारी सदस्य पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थित मासिक मिटिंगमध्ये संपूर्ण सामाजिक आढावा घेत वेगवेगळ्या समस्यांचे निवारण करण्यात आले.त्यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी मरगाळे सरांनी केले तर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करत राहुल शहापूरकर यांनी केले.