सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंड, कोरेगल्ली शहापूर बेळगाव यांच्या ७१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी झी युवा संगीत सम्राट फेम युवा शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन कार्यक्रम प्रचंड गर्दीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंडाचे अध्यक्ष श्री शिवाजी हवळणाचे होते.कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती समितीचे खजिनदार श्री प्रकाश मरगाळे आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन नगरसेवक श्री शिवाजी मंडोळकर, कोरे गल्ली पंच शांताराम गवडोजी,महिला आघाडी अध्यक्षा सौ रेणू किल्लेकर, समिती नेते मदन बामणे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर महेश नाईक, सुनील बोकडे, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख पाहुण्यांचा आणि देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी हवळनाचे यांनी फंडाचा वार्षिक अहवाल यावेळी सादर केला.यावेळी जालन्या वरून आलेले युवा शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या शाहिरी पथकाने शिवजन्मा पासून शिवकालीन पोवाडे सादर केले त्या सोबतच त्यांनी समाज प्रबोधन पोवाडे सुद्धा सादर केले. या कार्यक्रमाला रंगात तेव्हा आली जेव्हा माझी मैना गावावर राहिली ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील छक्कड सादर केली. गेली दोन वर्षे कोविड मुळे बेळगाव मध्ये जाहीर कार्यक्रम झाले नव्हते त्यामुळे सदर कार्यक्रमाला तुडुंब गर्दी झाली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त सन्मित्र फंड, युवक मंडळ, मनोहर शहापूरकर,सुनील हवळनाचे,महेश पेडणेकर,महेश कुंडेकर,किशोर पवार,राजाराम मजुकर,प्रशांत शहापूरकर,गोकुळ पाटील, परशराम गावडोजी,अभिजित मजुकर, प्रवीण शहापुरकर, यतीन हंडे ,योगेश पेडणेकर,प्रमोद शहापूरकर,आदींनी प्रयत्न केले.श्री महादेव पाटील आणि प्रशांत बिरजे यांनी सूत्रसंचालन केले.