कोरोना वॉरियर म्हणून सरकारी हॉस्पिटल मध्ये अनेक परिचारिकांना कामावर रुजू करण्यात आले मात्र आता 31 मार्च रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने कर्नाटक संयुक्त आरोग्य विभागाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा तसेच कामावर पुन्हा रुजू करून घ्यावे त्याकरिता चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चनम्मा सर्कल येथे आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सरकारी हॉस्पिटल मध्ये अनेक परिचारिकांनी काम केले आहे. तसेच या अनेक परिचारिकांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र त्यांना कोणत्याही प्रकाराची मदत देण्यात न आल्याने तसेच रुग्नांनाच्या सेवेत रुजू असलेल्या व्यक्तींना कामावरून काढून टाकण्यात आल्याने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.