सिल्वर ओक या मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरातील विविध संघटनांनी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शरद पवार यांच्या मुंबईवर झालेल्या घरावर झालेला हल्ला हा सुनियोजित होता. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याकरिता बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेस, समिती आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना सादर केले आहे.
तसेच या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनादेखील पाठविण्यात आल्या आहेत. सदर निवेदन आज बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल जाधव दत्ता जाधव बेळगाव जिल्हा पंचायत सदस्य सदस्य सरस्वती पाटील माजी महापौर शिवाजी सुंठकर प्रकाश मरगाळे किरण हुद्दार धनंजय पाटील वकील एमजे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले आहे.