श्री भगवान महावीर स्वामींचा जन्म कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सदर पत्रकार परिषद श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621 सगळ्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक-सांस्कृतिक माहिती देण्याकरिता आयोजित करण्यात आली होती.
गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत 40 चित्ररथ त्याचबरोबर शंभर बुलेट स्वार युवक-युवती सहभागी होणार आहे. याचबरोबर आज सायंकाळी सात वाजता हिंदवाडी महावीर भवन येथे सुप्रसिद्ध हास्यकवी श्री जगदीश जैन यांच्या हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेंद्र जैन यांनी दिली.
याचबरोबर महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध मार्गावर चाळीस चित्ररथ शोभेचे आकर्षण ठरणार आहे. तसेच या चित्ररथाची सांगता महावीर भवन हिंदवाडी येथे होणार असून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात ची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी जन्म कल्याण महोत्सव समितीचे राजेंद्र जक्कन्नवर राजू खोडा हिराचंद कलमनी कुंतीनाथ कलमनी संजय पोरवाल यांच्यासह आदी उपस्थित होते