म्हैसूर येथील कलामंदिरात डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेन्द्र कुमार आणि अनिता सुरेन्द्र कुमार यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी या स्पर्धेत बेळगावच्या धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत एकूण 37 संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत संघामध्ये धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावित पहिल्या क्रमांकावर आपले शिक्कामोर्तब केले.
यावेळी त्यांना 35 हजार रुपये तसेच चांदीची सरस्वती मूर्ती देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत अंतिम फेरी तेरा संघ सहभागी झाले होते. धरणे महिला मंडळाने एकाहून एक सरस जिने भजने सादर केली.
धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्यांना दिनांक 14 एप्रिल रोजी बेंगलोर येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे होणाऱ्या महावीर जयंती कार्यक्रमात भाग घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज मुंबई हे देखील सहभागी होत असल्याने धरणी महिला मंडळाला अत्यानंद झाला आहे.