बेटगिरी येथील मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला तेव्हा मनिषा काजू वेचत होत्या .त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी त्या गंभीर अवस्थेत होत्या .त्यामुळे त्यांना येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
मात्र येथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने खानापूर येथून पोलिसांना सोबत घेऊन बेळगावला धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला