राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तविली जात आहे. मात्र नियोजनाप्रमाणे 16 मे पासून शाळेला सुरुवात करणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री नागेश यांनी बेंगळुर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
जून किंवा जुलै या कालावधीत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे . गेल्या दोन वर्षात शैक्षणिक क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे याचा विचार करून 16 मेपासून पहिली ते दहावी शाळेला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकार आरोग्य खाते ,कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार सदर गोष्टींचे पालन करण्यात येईल.तसेच
बेंगलोर मधील फ्लोरेन्स शाळेने बायबल शिकणे सक्तीचे करणे हे कर्नाटक शिक्षण कायद्याच्या विरोधात आहे त्यामुळे या शाळेला नोटीस बजावण्याची सूचना अधिकार्यांना दिली आहे.
शाळा केंद्र सरकारच्या सी बी एस सी मंडळाच्या अंतर्गत येत असली तरी राज्याच्या शिक्षण कायद्यानुसार चालविणे गरजेचे आहे .यामुळे या शाळेला नोटीस देऊन उत्तर आल्यानंतर कोणती कारवाई करावी याबाबतची शिफारस सीबीएससी मंडळाला करण्यात येईल असे मंत्री नागेश यांनी सांगितले आहे .