दर तीन वर्षांनी दक्षिण भारत जैन सभेचा वतीने देण्यात येणारा प्रभातकार वा. रा कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लिय संदेश कन्नड वृत्तपत्राचे संपादक कुंतीनाथ कलमनी याना घोषित केला आहे.
अलीकडे सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समिती बैठकी मध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली . दक्षिण भारत जैन सभेतर्फे दर तीन वर्षांनी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो.
यावेळी 24 पैकी 4 पुरस्कार कर्नाटकात देण्यात आले आहेत. वृषभश्री पुरस्कार विजेते आणि जिल्हास्तरीय राज्योत्सव पुरस्कार विजेते कुंतीनाथ कलमनी यांना ” प्रभातकार वा रा, कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे. कुंतीनाथ कलमनी हे गेल्या 22 वर्षांपासून बेळगावच्या माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. 25 वर्षांपासून त्यांनी जैन समाजा मध्ये उल्लेखनीय काम केले आहे. येत्या 15 मे रोजी सांगली येथे होणाऱ्या दक्षिण भारतीय जैन सभेच्या शताब्दी समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.